गुहागर : कुडली शाळेत विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन

Aug 24, 2024 - 12:15
 0
गुहागर : कुडली शाळेत विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील कुडली नं. ३ माटलवाडी शाळेमध्ये साने गुरुजी विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन झाले.

या बचत बँकेची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी लोकांसमोर मांडली. खारतोडे, पाडवी यांनी या बचत बँकेच्या कागदपत्रांचे नियोजन केले.

विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी व बँकेचे सर्व व्यवहार विद्यार्थ्यांना समजावे, बँकेत पावती भरून रक्कम काढणे, बँकेत पावती भरून रक्कम भरणे, पासबुकामध्ये नोंद करणे या गोष्टी बँकेमध्ये केल्या जाणार आहेत.

शाळेतील विद्यार्थी बँक मॅनेजर, कॅशियर व इतर कर्मचारी राहणार आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या बँकेमधील अडचणी लहान वयातच मुलांना सोडवता याव्यात, हा उद्देश समोर ठेवून या बँकेची निर्मिती करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow