देवरूख- बोंड्ये एसटी अखेर सुरू

Aug 24, 2024 - 12:03
Aug 24, 2024 - 12:38
 0
देवरूख- बोंड्ये एसटी अखेर सुरू

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्गावरील बोंड्ये गावातील नागरिकांची एसटीची प्रतीक्षा संपली असून, पुन्हा देवरूख-बोंड्ये एसटी आगारमधून सोडण्यात आली. बोंडये बससाठी संदीप गुडेकर, माजी सरपंच ललिता गुडेकर, विद्यमान सरपंच नम्रता पांचाळ यांनी आगार व्यवस्थापकांना पत्रव्यवहार करून झाडीची असलेली अडचण, खड्डे ही समस्या मार्गी लागली. देवरुख-बोंड्ये एसटी सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून देवरूख आगार व्यवस्थापक यांनी एसटी सुरू केली. त्यामुळे बोंडये गावच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांचे आभार मानले,. काही दिवसांवर गणपती उत्सव आहे. हजारो मुंबईकर, अन्य भागातील पाहुणे या मार्गावरून ये-जा करणार असून त्यांनाही या समस्यांना तोंड द्यावे लागणार होते.

विद्यार्थी चाकरमानी, नोकरदार यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार होता; मात्र लोकप्रतिनिधी, देवरुख आगाराने मागणीची दखल घेत एसटी सुरू झाल्यामुळे त्रासातून बोंडये गावातील लोकांची सुटका झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow