खेड नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये औषधांचा तुटवडा

Aug 24, 2024 - 12:48
 0
खेड  नगरपालिकेच्या  दवाखान्यामध्ये औषधांचा तुटवडा

खेड : सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी राज्यभरात आपला दवाखाना सुरू झाला आहे. येथील नगरपालिकेच्या दवाखान्यातही 'आपला दवाखाना' सुरू झाला आहे. मात्र, या दवाखान्यात औषधांचा पत्ताच नसल्याची बाब समोर आली आहे. औषधाअभावी रुग्णांची हेळसांड होत असून आर्थिक भुर्दंड सहन करत औषधे खरेदी करावी लागत आहेत.

शहरात डेंग्यूसह तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. रुग्ण तपासणीसाठी पालिकेच्या एकविरानगर येथील इमारतीलगत सुरू झालेल्या आपला दवाखान्यात उपचारासाठी जात आहेत. मात्र, याठिकाणी गेल्यानंतर औषधेच मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. आपला दवाखान्यात औषधांचा तुटवडा निर्माण झालेला असतानाही तालुका आरोग्य अधिकारी ही बाब गांभीयनि घेत नसल्याने रुग्णांची परवडच सुरू आहे. दवाखाना सुरू झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका व आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र औषधांचा अभाव असल्याने हे रुग्णालय केवळ नावापुरतेच उरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow