चिपळूणच्या संतोष शिंदे यांना श्रमगौरव पुरस्कार प्रदान

Aug 24, 2024 - 11:22
Aug 24, 2024 - 14:26
 0
चिपळूणच्या संतोष शिंदे यांना श्रमगौरव पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व. गं. द. आंबेकर यांच्या ११७ व्या जयंती निमित्ताने देण्यात येणारा गं. द. आंबेकर जीवनगौरव व श्रमगौरव पुरस्कार चिपळूणच्या संतोष शिंदे यांना त्यांच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. हा सोहळा परेल येथील महात्मा गांधी सभागृहात झाला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते. तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित हेते. शिंदे हे हिंदुस्तान युनिलिव्हर लि. लोटे एमआयडीसी चिपळूण येथे कार्यरत आहेत. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गं. द. आंबेकर श्रमगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिंदे यांना यापूर्वी शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारही मिळाला आहे. सामाजिक, कला, क्रीडाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिंदे यांच्या कामाची दखल घेत हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केला. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या वेळी मान्यवर पाहुणे यांचे स्वागत व पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला. या वेळी आमदार तथा कामगार नेते भाई जगताप, काशीनाथ माटल, बजरंग चव्हाण व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow