राजापूर येथील पासपोर्ट सेवाकेंद्रातून सव्वा वर्षात १३ हजार १७६ पासपोर्ट

Aug 24, 2024 - 14:38
Aug 24, 2024 - 14:40
 0
राजापूर  येथील  पासपोर्ट सेवाकेंद्रातून सव्वा वर्षात १३ हजार १७६ पासपोर्ट

रत्नागिरी : राजापूर येथील पोस्ट कार्यालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या पासपोर्ट (पारपत्र) सेवाकेंद्रातून गेल्या मागील सव्या वर्षात १३ हजार १७६ पासपोर्ट देण्यात आले. या सुविधा केंद्रात नोदणी केल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांत पासपोर्ट मिळतो. यामध्ये पोलिसांकडून तीन ते चार दिवसांत पडताळणी (व्हेरिफिकेशन) होत असल्यामुळे पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिकच सुलभ झाली आहे. 

परदेश प्रवासासाठी पासपोर्ट आवश्यक असतो, पूर्वी पासपोर्टसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यानंतर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता; परंतु आता राजापूर येथील पोस्ट कार्यालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पासपोर्टसाठी पूर्वीसारख्या फेऱ्या न मारता ऑनलाइन अर्ज करावा लागतो तसेच कागदपत्र जमा करण्यासाठी मुलाखतीचा दिवस स्वतःच उरकता येतो. त्यामुळे पासपोर्टची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता वेळेवर केली असेल तर पोलिसांकडूनही व्हेरीफेकेशन अगदी चार दिवसांत होते. त्यामुळे पासपोर्टही वेळेवर अगदी घरपोच पाठवला जातो. ऑनलाइन प्रक्रिया तसेच राजापूर पोस्ट कार्यालयात दररोज वेळेवर प्रस्तावांचा निपटारा केला जातो. दिवसाला ६० अर्जाची पडताळणी केली जाते तसेच २० प्रस्ताव पोलिस व्हेरिफिकेशनसाठी येतात. राजापूर येथील पासपोर्ट सेवाकेंद्रात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ९ हजार ७२६ पासपोर्ट दिले गेले तर १ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ३ हजार ४५० पासपोर्ट दिले गेले. नवीन पासपोर्ट नूतनीकरण, नावात बदत, लहान मुलांसाठी पासपोर्ट सुविधा दिल्या जातात. 

अशी सुविधा दिली जाते
पासपोर्टसाठी त्या व्यक्तीचे आधारकार्ड, मतदार कार्ड किंवा छायाचित्र असलेला पुरावा आधी कागदपत्रांच्या सत्य प्रती तसेच मूळ प्रती सादर कराव्या लागतात. पासपोर्टसाठी www.passportindia. gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. त्यानंतर केवळ पंधराशे रुपयांचे चलन भरावे लागते.

येथील पासपोर्ट सेवाकेंद्रातील सेवा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी आहे आहेत्या अर्जदारांना चांगली सुविधा देण्यासाठी केंद्रात दोन विशेष प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर कागदपत्र व्यस्थित असतील तर पंधरा दिवसात पासपोर्ट मिळतो. ही सेवा दोन जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहे - नंदकुमार कुरलपकर, डाककचर अधीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow