गरम तवा मारुन केली पत्नीला दुखापत

Aug 26, 2024 - 11:28
 0
गरम तवा मारुन केली पत्नीला दुखापत

रत्नागिरी : गॅस शेगडीवरील गरम तवा मारुन दुखापत व मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश कृष्णा कोडविलकर (रा. मातश्री बंगला, कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास राजनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती निलेश याने त्यांच्याशी भांडण करुन गॅस शेगडीवरील गरम तवा त्यांच्या डाव्या खांद्यावर मारुन दुखापत केली. तर मारहाण व शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित निलेश कोंडविलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow