चुलतीला अश्लिल चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्यावर गुन्हा

Aug 27, 2024 - 12:43
 0
चुलतीला अश्लिल चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्यावर गुन्हा

संगमेश्वर : चुलती व चुलत भावाला अश्लिल चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना करजुवे गावात घडली.

चुलता गोव्याला कामाला असल्याचा फायदा घेत पुतण्याने चुलती आणि चुलत भावाला अश्लिील चित्रफीत दाखवली. अश्लील चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोस्को २१२ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा मुंबईला कामाला असतो. तो काही दिवसापूर्वी गावाला आला होता. तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:12 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow