संगमेश्वर : सोनवी पुलावर मोठे खड्डे

Aug 27, 2024 - 14:36
 0
संगमेश्वर : सोनवी पुलावर मोठे खड्डे

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सौनवी पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसात खड्यात पाणी साचल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यात आहे हे सर्व खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, अशी प्रवाशांसह स्थानिकांनी केली आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना मुंबई-गोवा महा‌मार्गाची आरवली ते बावनदी दरम्यान अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या खड्डयामुळे वाहतूक मंदावत असून अनेक ठिकाणी ठप्प होत आहे. गणेशोत्सवदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी म्हणून महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या कंपन्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू केली गेली नाही संगमेश्वर का स्थानकाजवळ आणि सोनवी पुलावर रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तेथून जाताना वाहने कासव गतीने पुढे सरकतात एखादे वाहन भरधाव आल्यास येथे मोठा अपघाताची भीती पादचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

या मार्गावर छोटे मोठे अपघातही घडत आहेत, संगमेश्वर बसस्थानकाजवळील नवीन पुलाचे काम सुरू असताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे वाहन चालकांचे मत आहे. गणेशोत्सवापूर्वी सोनवी पुलासह आरवली ते बावनदी दरम्यान पडलेले सर्व खड्डे प्राधान्याने बुजविण्यात यावेत, गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात असत यांचा अंदाज न आल्याने चाकरमान्यांना त्याचा कस सहन करावा लागू शकतो. अपघातानेही धोके निर्माण होऊ शकता. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या खड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांनी तसेच पादचाऱ्यांनी केली आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याता खड्डे पडले आहेत. सोनवी पूलावरील खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गाड्या घेऊन कोकणात येतात. त्यामुळे त्यांना या धोकादायक खड्ड्यांचा सामना करावा लागेल. गुरू सावंत, पालक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow