भातावरील कीडरोग सर्वेक्षणासाठी क्रॉपसॅप

Aug 27, 2024 - 15:19
 0
भातावरील कीडरोग सर्वेक्षणासाठी क्रॉपसॅप

राजापूर : विविध कारणामुळे मातशेतीचे उत्पादन घटत आहे. त्याचवेळी पुरेशा मनुष्यासह अन्य विविध कारणांमुळे भातशेती आर्थिकदृश्या परवडत नाही. भातशेती धोक्यात असताना कीड जाणि रोगांचे सर्वेक्षण करून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरणारा क्रॉपसॅप हा महत्वाकांक्षी आहे.

या प्रकल्पासाठी तालुक्यातील ३० गावांची निवड केली आहे. त्यामध्ये निवडलेल्या क्षेत्रावरी रोग यांचे एम क्रॉपसप या प्रणालीद्वारे मोबाईलच्या साह्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. आठवड्यातून दोन दिवस पिकांच्या अवस्थेनुसार त्यावर येणाऱ्या किडीं जाणि रोगांचे हे सर्वेक्षण केले जाणार असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यारत राहणार असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली कीड आणि रोगांचे सर्वेक्षण, शेतकऱ्याला अलर्ट करणे, शेतीचे नुकसान टाळणे, पीक उत्पादन वाढण्याचा सल्ला, आदी उद्देशाने क्रॉपॉप हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून राबवला जात आहे. त्याची तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांच्या मार्गदर्शकाती अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार त्यावर येणाऱ्या किडी आणि रोगांचे सर्वेक्षणा केले जाते. त्या सर्वेक्षणामध्ये किडीचा प्रादुर्भाव किती आहे, याचा अभ्यास होऊन त्याचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

असे होणार सर्व्हेक्षण
आठवडयातून दोन दिवस यांचे एम क्रॉपसप या प्रणालीद्वारे मोबाईलच्या साह्याने सर्वेक्षण करून डाटा अॅपवर अपलोड़ केला जातो त्यामध्ये भातपिकावर दिसून आलेल्या तुडतुडे, निले भुगरे, खोडकिडा यांसह कन्य किडीचे सर्वेक्षण केले जाते. कीड सर्वेक्षणामध्ये दिसून आलेल्या संबंधित किडींच्या संख्येची तीव्रता मोबाईल अॅपवर माही जाते. हा डाटा एग्जायतीकडे पाठवला जातो. त्याचा अभ्यास होऊन तीतेपेक्षा किडींची संख्या जास्त असल्यास तकन्यांशी संवाद साधून कीट नियंत्रणासंबंधी मार्गदर्शन केले जाते.

क्रॉपसॅप प्रकल्पासाठी निवडलेली गावे
हातणकरवाडी, नेरकेवाडी, धोपेश्वर, पन्हळेतर्फ राजापूर, शीळ, कोंडेतर्फ सौंदळमधील खालचीवाडी, दोनिवडे, पांगरेबुद्रुक, धाऊलवल्ली, नाटे, आंबोळगड, मिठगवाणे, जैतापूर, सोलगाव, भू, भालावली, पेंडखळे, शिवणेबुद्रुक, सोगमवाडी, अणसुरे, बाकाळे, देवाचेगोठणे, कशेळी-वरचीवाडी, राजवाडी, सौंदळ, कारवली, तळवडे, कोळवणखडी, मूर, सावडाव.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow