रत्नागिरी : राज्य नाट्यस्पर्धांच्या प्रवेशिकांना मुदतवाढ

Aug 28, 2024 - 13:52
 0
रत्नागिरी : राज्य नाट्यस्पर्धांच्या प्रवेशिकांना मुदतवाढ

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यासाठी आता ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या वर्गवारीसाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. त्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट होती; मात्र काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. जास्तीत जास्त संघांना या स्पर्धेत भाग घेता यावा, यासाठी मंत्रालयात प्राप्त झालेल्या संस्थांच्या निवेदनाचा विचार करून सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी प्रवेशिका मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना सांस्कृतिक कार्यालयाला दिली. त्याप्रमाणे राज्य नाट्यस्पर्धेतील संघांना प्रवेशिका सादर करण्यासाठी आता ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीच्या अनुषंगाने राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग बालनाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने htts;//mahanatyaspardha.com या वेबसाईटवर प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow