आंबोली येथे क्रिडाईची राज्यस्तरीय बैठक संपन्न

Aug 28, 2024 - 14:00
Aug 28, 2024 - 14:02
 0
आंबोली येथे क्रिडाईची राज्यस्तरीय बैठक संपन्न

रत्नागिरी : क्रिडाईल्या महाराष्ट्र दक्षिण-पश्चिम विभागाची चौथी विभागीय बैठक क्रिडाई गडहिंग्लज आणि क्रिडाई कागल यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली येथील डार्क फरिस्ट रिसोर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातील १७ शहरांमधून ११५ सदस्य उपस्थित होते.

क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव पारीख यांनी बांधकाम व्यवसाय व्यवस्थापनेसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच रेरा समितीचे सहसंयोजक आदित्य बेडेकर यांनी रेरा कायद्यात पुढील काही काळात होणारे बदल व रेरा कायद्यातील नवनवीन सुधारणा याबद्दल माहिती दिली. येणाऱ्या काळात रेरा कायदा समजून घेऊन विकासकामे करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन केले. प्रकाश देवळापूरकर यांनी प्लॉटिंग, बिनशेती, प्लॉटिंगमधील जीएसटी कायद्यातील तरतुदीचे महत्व काय? याबाबत माहिती दिली. सेवानिवृत्त सर्कल इन्स्पेक्टर शिवकुमार पाटील आणि संगणक ऑपरेटर कृष्णनाथ जाधव यांनी शासनाच्या महसूल कायद्यातील डिजिटलायजेशन पद्धतीने बनवण्यात येणारे ई-सातबारा (७/१२) आणि ई-चावडी ऑनलाईन कसे वाचावे, त्याचा वापर बांधकाम व्यवसायात कसा करता येईल, याबाबत प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन केले. क्रिडाई कागल यांनी ऋषिकेश मगर, रियल इस्टेटमध्ये ब्रडिंग कसे करायचे, त्याचा फायदा बांधकाम व्यवसायात कसा होईल, याबाबत सर्व विकासकामांना मार्गदर्शन केले. क्रिडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते, क्रिडाई महाराष्ट्रचे दीपक साळवी आणि बोर्ड सदस्य प्रवीण लाड उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow