लांजा : कुवे-माळवाडीत हातभट्टी दारू विक्रीवर छापा
लांजा : कुवे-माळवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्रीवर कारवाई केली. लांजा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगेश विठ्ठल गुरव (वय ४५, रा. कुवे गुरववाडी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी येथील शंकर सुर्वे यांच्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीच्या आडोशाला संशयित मंगेश गुरव हातभट्टीच्या दारूसह आढळून आला. पोलिसांनी ४२५ रुपयांची चार लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 30/Aug/2024
What's Your Reaction?