पोलिस भरतीच्या आमिषाने साडेसोळा लाखांचा गंडा

Jul 24, 2024 - 10:10
Jul 24, 2024 - 16:19
 0
पोलिस भरतीच्या आमिषाने साडेसोळा लाखांचा गंडा

सिंधुदुर्ग : पोलीस कर्मचारी पदावर मुलाला कामाला लावतो म्हणत साडेसोळा लाखांना एकाने गंडा घातला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार हे अबकारी विभागात येथे कार्यरत होते व सध्या ते सेवानिवृत्त आहेत.

माहे डिसेंबर- २०२२ मध्ये ते पत्रादेवी चेकपोस्टवर कर्तव्यावर असतांना संशयित संदीप गुरव हा गोवा येथे जात होता. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांचे वाहन थांबवून चौकशी केली असता त्याने स्वतःची ओळख डॉ. संदीप गुरव, पी.एस. आय. कोल्हापूर अशी करुन दिली होती. त्यावेळी त्यांने तक्रारदाराची कौटुंबिक माहिती घेतली व त्यांच्या मुलास पोलिस शिपाई पदावर नोकरीस लावतो असे आमिष दाखवून तक्रारदारांकडून वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६ लाख ४७ हजार रू. रोख व चेक स्वरुपात घेतले. त्यानंतर तक्रारदारांनी श्री. गुरव यांच्याकडे पोलिस भरतीबाबत अनेक वेळा विचारणा केली असता, तो वेगवेगळी कारणे देत होता.

दरम्यान माहे जुलै-२०२४ मध्ये तक्रारदार टीव्हीवरील बातम्या पाहत असतांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाणे, खडकी (जि. पुणे) येथे दाखल गुन्हयामध्ये आरोपीचा फोटो व नांव संदीप गुरव यास अटक केल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजून आले. याबाबत त्यांनी फिर्याद दिली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:30 PM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow