साईडपट्टी खचल्याने पानवल येथे एस.टी. बस कलंडली

Sep 3, 2024 - 10:28
 0
साईडपट्टी खचल्याने पानवल येथे एस.टी. बस कलंडली

रत्नागिरी : तालुक्यातील पानवल येथे सोमवारी सकाळी ८.५० वा. रस्त्याची साईडपट्टी खचल्याने एसटी कलंडली. ही एसटी बस रिकामी असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमवारी सकाळी चालक आपल्या ताब्यातील एसटी (एमएच२०-बीएल-४०२७) घेउन रत्नागिरी ते पानवल असा जात होता. ही एसटी ब्राम्हणवाडीच्या पुढे गेली असता पावसामुळे रस्त्याची साईडपट्टी खचून बस कलंडली. बसमध्ये एकही प्रवासी नव्हता तसेच सुदैवाने चालक आणि वाहकही बचावल्याने पुढील अनर्थ टळला. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow