देवरूख खालची आळी येथे ९ फुटी अजगराला जीवदान

Sep 3, 2024 - 12:25
 0
देवरूख खालची आळी येथे ९ फुटी अजगराला जीवदान

साडवली : देवरूख खालची आळी येथे राकेश खवळे यांच्या घराशेजारील पाराजवळ अजगर आढळून आला. स्थानिक तरुणांनी लक्ष ठेऊन वनविभाग व सर्पमित्र राजा गायकवाड यांना कळवले.

यानंतर गायकवाड यांनी या अजगराला पकडले. अजगराला पकडण्यासाठी स्थानिक तरुणांनी सहकार्य केले. सुमारे ९ फूट लांबीचा अजगर होता. अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वनविभागाने अजगराला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow