खेड तहसील कार्यालयात माथेफिरूकडून तोडफोड

Sep 3, 2024 - 14:37
 0
खेड तहसील कार्यालयात माथेफिरूकडून तोडफोड

खेड : खेड तहसीलदार कार्यालयात रविवारी सकाळी एका माथेफिरू तरुणाने अक्षरशः हैदोस घातला. सकाळी माथेफिरू तहसील कार्यालयात घुसला आणि त्याने खिडक्यांच्या काचा फोडल्या. तहसीलदारांच्या केबिनच्या दरवाज्याची काचही फोडण्याचा प्रयत्न केला. 

याबाबत तहसील कार्यालयातील वॉचमनने पोलिसांना कळवली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. हा माथेफिरू व्यक्तीने फक्त तहसील कार्यालयातच का तोडफोड केली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच ही व्यक्ती कोण होती, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न पडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow