गुहागरमध्ये कामगार सुविधा केंद्राची स्थापना

Sep 3, 2024 - 11:41
Sep 3, 2024 - 14:47
 0
गुहागरमध्ये कामगार सुविधा केंद्राची स्थापना

गुहागर : राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटपाच्या मदतीसाठी तालुकास्तरावर तालुका कामगार सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सुविधा केंद्रांचा थेट लाभ बांधकाम कामगारांनी घेण्याचे आवाहन भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नीलेश सुर्वे यांनी केले आहे.

पूर्वी जिल्ह्याला एकच कामगार व सुविधा केंद्र होते यामुळे जिल्हाभरातील कामगारांची गैरसोय होत होती. यामुळे शेवटच्या स्तरातील बांधकाम कामगार नोंदणीकृत होऊन त्याला लाभ वाटपाचा फायदा मिळावा या उद्देशाने ना. खाडे यांनी १५ मार्च रोजी तालुका कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्याची अधिसूचना काढली आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

गुहागर तालुक्यामध्ये सुरू झालेल्या कामगार सुविधा केंद्राला भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सु यांनी भेट दिली. हे लाभ बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी काही संस्था, काही व्यक्ती जर चुकीच्र पद्धतीने काम करत असतील तर त्याल सुद्धा आळा ठेवण्याचे काम या केंद्रावर केले पाहिजे, अशी सूचना सुर्वे यांन दिली.

यावेळी तालुका सरचिटणी सचिन ओक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोटे शहराध्यक्ष नरेश पवार, तालुका उपाध्यक्ष श्रद्धा घाडे, उमेश भोसले शहर सरचिटणीस संतोष सांगळे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय मालप, किरण गडदे आदींस पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow