चिपळूण : डीबीजे महाविद्यालयाच्या हर्षद बेंडके याची थल सैनिकी कॅम्पसाठी निवड
चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी हर्षद बेंडके याची दिल्ली येथील राष्ट्रीय थल सैनिकी कॅम्पसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. थल सैनिक कॅम्प रिपब्लिक कॅम्प नंतरचा प्रतिष्ठीत आणि एनसीसीमधील अत्यंत कठीण कॅम्प समजला जातो. हर्षद बेंडके यांची 'ओबस्टॅकल 'टीममध्ये निवड झाली. ३१ ऑगस्ट रोजी तो दिल्लीसाठी रवाना झाला आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल सत्यशील बाबर, संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, नियामक समिती सदस्य, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव बापट, डम ऑफिसर कर्नल के. पद्मनाभन्, लेफ्टनंट प्रा. मधुसूदन माने, कॅप्टन नम्रता माने, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 03/Sep/2024
What's Your Reaction?