कोकण मराठी साहित्य परिषदच्या खेड अध्यक्षपदी विवेक दांडेकर यांची निवड

Sep 3, 2024 - 11:51
Sep 3, 2024 - 15:01
 0
कोकण मराठी साहित्य परिषदच्या खेड अध्यक्षपदी विवेक दांडेकर यांची निवड

खेड : कोकण मराठी साहित्य परिषद खेड शाखेची पुनर्रचना करण्यात आली असून, अध्यक्षपदी विवेक उर्फ राजन दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, मालगुंड येथील केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. खेड शाखेतर्फे या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुनर्रचित कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष शेलार यांनी केली.

पुनर्रचित कार्यकारिणीत अध्यक्ष विवेक उर्फ राजन दांडेकर, उपाध्यक्ष प्रा. संपदा काळे, प्रा. कविता जंगम, सेक्रेटरी जलाल राजपुरकर, सह सेक्रेटरी प्रा. अनघा तोडकरी, खजिनदार इकबाल फकी, जिल्हा प्रतिनिधी गोविंद राठोड, कार्यकारणी सदस्य विष्णू पणदेरे, आबा निकम, शशिकांत मेहता, प्रा. वसंत भुसारे, अंजली गिल्डा, भरत कारले, चंद्रकांत मामड्याळ, प्रा. सुनंदा पाटील, स्वप्नील वनारे, किशोर धुत्रे, जयंता शेठ, राकेश देवरुखकर, रवींद्र शिगवण, चंद्रकांत दळवी, महिला शक्ती विभाग प्रमुख अनघा तोडकरी, युवा शक्ती विभाग प्रमुख किशोर धुत्रे यांची निवड करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow