देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सव आजपासून

Sep 4, 2024 - 10:14
 0
देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सव आजपासून

संगमेश्वर : भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सवाला प्रारंभ अशी परंपरा आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील ऐतिहासिक चौसोपी वाड्यातील गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठीला संपतो. या वेगळ्या परंपरेला कारणही वेगळे आहे. यंदा गणेशोत्सव ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

बुधवारी सकाळी मिरवणुकीने आणि वाजतगाजत श्रींचे आगमन होणार आहे. यावर्षी प्रथेप्रमाणे वाजतगाजत श्रींचे चौसोपी वाड्यात आगमन होईल. विशेष म्हणजे चौसोपी वाड्यातील गणेशमूर्ती ही घोड्यावर बसलेली असते. दरवर्षीप्रमाणे येथे विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अन्यत्र गणेशोत्सवाची सुरवात ७ सप्टेंबरपासून होणार असली तरीही चौसोपी वाड्यात ४ सप्टेंबरपासून उत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी देवरूख शहर सज्ज झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow