रत्नागिरी : शिवसृष्टीतील विटंबना - उद्यान पर्यवेक्षकांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Sep 4, 2024 - 11:13
Sep 4, 2024 - 11:17
 0
रत्नागिरी : शिवसृष्टीतील विटंबना - उद्यान पर्यवेक्षकांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील सर्कलमधल्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याप्रकरणी रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक नितीन यादव यांची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे. समितीकडून उद्यान पर्यवेक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे की नाही याबाबत चौकशी केली जाणार आहे.

मारुतीमंदिर सर्कलमधील मावळ्यांच्या मूर्ती विटंबनेसंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते राहुल पंडित, बिपीन बंदरकर, विजय खेडेकर, दीपक पवार, पप्पू सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबतची माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली. एकीकडे पोलिसांचा तपास सुरु झाला असतानाच उद्यान पर्यवेक्षकांच्या कर्तव्यात कसूर झाला आहे की नाही, याची चौकशी करण्याच्या सूचना मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केल्या. त्यानुसार उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे.

उद्यान पर्यवेक्षकांनी नगर परीषदेच्या उद्यानांसह शिवसृष्टीच्या ठिकाणी दररोज सकाळी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करायची असते. त्यांच्या या कामात हलगर्जीपणा झाला आहे का, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती का अशा अनेक मुद्यांची चौकशी करुन पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow