संगमेश्वर : पोलिसपाटलांना चार महिने मानधन नाही

Sep 4, 2024 - 12:28
Sep 4, 2024 - 14:30
 0
संगमेश्वर : पोलिसपाटलांना चार महिने मानधन नाही

माखजन : प्रत्येक गावामध्ये पोलिस खात्याच्या, खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पोलिस पाटलांना गेले चार महिने मानधन मिळाले नसल्याने पोलिसपाटील चिंतेत आहेत. गेले चार महिने संगमेश्वर तालुक्यातील पोलिस पाटलांना फक्त 'मान' आहे पण 'धन' नाही अशी परिस्थिती झाली आहे. हीच परिस्थिती अन्य तालुक्यांत असल्याचे चित्र आहे.

शिंदे सरकारने मोठा निर्णय घेत पोलिसपाटलांच्या मानधनात प्रतिमहिना असलेल्या ६ हजार ५०० मानधनावरून १५ हजार इतकी भरघोस वाढ केली. पण यात अनियमितता असल्याने पोलिस पाटलांची कुचंबणा झाली आहे. पोलिसपाटलांची सेवा खरं तर सात दिवस चोवीस तास अशीच आहे. कोणत्याही क्षणी पोलिस खात्यातून फोन आला की घटनेच्या ठिकाणी पोलिसपाटलांना थांबावे लागते. एखाद्या गावात पोलिस पाटील सेवानिवृत्त झाले असतील तर बाजूच्या गावातील पोलिसपाटलांकडे अतिरिक्त कार्यभार दिला जातो. पोलिसपाटील एवढी तत्परता दाखवत असूनदेखील नेहमी मानधन अनियमित होत असल्याने, पोलिसपाटलांना संसाराची आर्थिक गणित मांडताना, मानधनासाठी चातकाप्रमाणे वाटच बघावी लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हक्काच्या मानधनासाठी पोलिस पाटलांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow