विद्यार्थी बाल गणेश : AI ने बनवले गणपती बाप्पाचे अफलातून फोटो..

Sep 4, 2024 - 14:23
Sep 4, 2024 - 14:27
 0
विद्यार्थी बाल गणेश : AI ने बनवले गणपती बाप्पाचे अफलातून फोटो..

यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे शाळांनाही सुट्टी देण्यात येत आहे. मात्र, एआय म्हणजे आर्टीफिशियल इंजेलिजन्सने गणपती बाप्पांचे शाळेत जाणारे फोटो बनवले आहेत.

स्कूल चले हम या थीमवर आधारीत हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यामध्ये, शाळकरी गणेश पाहायला मिळतो.


 
7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आगमन होत असून घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे.


 
गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, तसेच अक्षरांचे अधिपती म्हणून गणरायला संबोधले जाते. आता, एआयद्वारे बनवण्यात आलेल्या गणपती बाप्पांच्या फोटोतून विद्या आणि विद्यालय दोन्हींची उजळण होत आहे


 
शाळेतील विद्यार्थी अवतारात बाप्पांचे हे फोटो पाहायला मिळत असून शाळेत गप्पा मारताना, फळ्यावर धडे गिरवताना, जेवण करताना बाप्पांचे फोटो दिसून येतात.


 
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटीझन्ससह भाविक भक्तांचं मन प्रसन्न करत आहेत. या फोटोला चांगली पसंती मिळत असून नेटीझन्स प्रतिक्रिया देत स्वागत करत आहेत.


 
यातील काही फोटोत गणपती बाप्पा हाती पेन्सिल आणि वही घेऊन वर्गात शिक्षण घेत असतानाही दिसून येतात. तसेच, पाठीव दफ्तर घेऊन शाळेत चालल्याचेही दिसून येतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow