राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात काँग्रेस विधानसभा लढवणार : अविनाश लाड

Sep 4, 2024 - 12:38
Sep 4, 2024 - 14:41
 0
राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात काँग्रेस विधानसभा लढवणार : अविनाश  लाड

लांजा : राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात विधानसभा लढवणार असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा, असे सूचक विधान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी वाकेड जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

यावेळी काँग्रेस लांजा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, लांजा शहर अध्यक्ष रवींद्र राणे, प्रतीक खरात, नुईत काजी, महंमद पावसकर, लांजा तालुका उप अध्यक्ष भारतीय काँग्रेस मकरंद जोशी आदी उपस्थित होते. 

कोकणच्या विकासाची झालेली अधोगती व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, यासाठी येणारी विधानसभा आमच्यासाठी, सर्वांसाठी महत्त्वाची आहे असे लाड यांनी आपल्या भाषणात भाषणात सांगितले. काँग्रेस पक्ष हाच तुमचा, आमचा गोरगरिबांचा आधार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या मेळाव्याला महिला, युवा, वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow