लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्ड्यांचं साम्राज्य

Sep 6, 2024 - 11:38
Sep 6, 2024 - 12:17
 0
लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्ड्यांचं  साम्राज्य

लांजा : लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मोठे खड्डे पडले असून, हे खड्डे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. या खड्यांपासून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून खड्डे त्वरित भरण्यात यावेत, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांमधून होत आहे.

गणेशोत्सव एक दिवसावर आला असून लांजा बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण हळुहळू वाढू लागले आहे. तालुक्यातील प्रवाशांनी नेहमी लांजा बसस्थानकात गर्दी होत असते. मात्र, गणेशोत्सवाला चाकरमानी येणार असल्याने लांजा बस स्थानकात मोठी गर्दी दिसून येणार आहे. बस स्थानक मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने ग्रामीण फेऱ्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांचा या स्थानकात थांबा असतो. सध्या बसस्थानक काँक्रिटीकरण झाले असले तरी स्थानकाच्या प्रवेश द्वारासमोर मोठे खड्डे पडले आहेत. मोठमोठे पडलेले खड्डे वाहन चालकांना त्रास दायक ठरत आहेत.

प्रवेशद्वारावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे साठलेले पाणी विद्यार्थी व प्रवाशांच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत. या खड्यांपासून अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानी वर्गालाही बस स्थानकात पडलेल्या खड्यांचा सामना करावा लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow