ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय : प्रशांत यादव

Sep 6, 2024 - 10:18
Sep 6, 2024 - 12:21
 0
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय : प्रशांत यादव

चिपळूण : दुग्ध व्यवसाय स्वयंपूर्ण होण्याचा व्यवसाय असून या व्यवसायात कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आमचे ध्येय असून यातून ग्रामीण आर्थिक स्तर उंचावेल, असे मत प्रशांत यादव यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, संचालिका अॅड. नयना पवार, रूपाली कदम, रमण डांगे आदी उपस्थित होते.

यावेळी रेश्मा पवार, प्रिया भुवड, भिलेच्या सरपंच आदिती गुढेकर, खेर्डी उपसरपंच सुप्रिया उतेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष राधा शिंदे, शहराध्यक्ष डॉ. रेहमत जबले, कार्याध्यक्ष अंजली कदम, सीमा रानडे, सीमा चाळके, रुही खेडेकर, स्नेहल चव्हाण, माधुरी शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी यादव यांजकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow