गणेशोत्सव कालावधीत लांजात मदत केंद्राची स्थापना

Sep 6, 2024 - 12:12
 0
गणेशोत्सव कालावधीत लांजात मदत केंद्राची स्थापना

लांजा : गणेशभक्तांच्या प्रवासात कुठेही अडचण येऊ नये, प्रवास सुखकर व्हावा याकरिता ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ आणि कुवे या ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. सदर मदत केंद्रामध्ये वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक डायल ११२-१००, चाईल्ड हेल्पलाईन-१०९८, महीला सुरक्षा हेल्पलाईन-१०९१, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन-१०९०, लांजा पोलीस ठाणे ०२३५१- २३००३३, पोलीस नियंत्रण कक्ष रत्नागिरी- ०२३४२- २२२२२२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow