छत्रपती शिवाजी महाराज अभियंत्यांचे अभियंता : अविनाश हळबे

Sep 6, 2024 - 12:30
 0
छत्रपती शिवाजी महाराज अभियंत्यांचे अभियंता : अविनाश हळबे

त्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अभियंत्यांचे अभियंता होते, असे प्रतिपादन पुण्यातील अविनाश हळबे यांनी येथे केले.

येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. हळबे पुणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पैलू स्पष्ट करून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख आणि विविध पैलूंचे महत्त्व समजावून दिले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ध्येये ठेवली होती, त्याप्रमाणे आपल्या धोरणांची निश्चिती केली होती. अभियांत्रिकी क्षेत्रात कोणत्याही उद्योगाचा विकास करायचा असेल तर चार एम म्हणजे मॅन (मनुष्यबळ), मशीन (उत्पादक यंत्रे), मटेरियल (कच्चा माल), मेथड (कार्यपद्धती) आणि एस - सेफ्टी (सुरक्षितता), ई - एन्व्हायर्नमेंट (पर्यावरण) या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याची पूर्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय कु.श्रावणी खांडेकर हिने ओघवत्या शब्दांत करून दिला. अध्यक्षीय समारोपात कला शाखेचे विभाग प्रमुख प्रा. वैभव कानिटकर यांनी शिवरायांच्या कारकिर्दीचे वर्णन करत असताना विद्यार्थ्यांना सांगितले की तुमच्या आयुष्याची लांबी महत्त्वाची नसून तुमच्या आयुष्याची खोली महत्त्वाची आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूर्वा शिरगावकर हिने केले तर सर्व मान्यवरांचे आभार कु. विदुला कुलकर्णी हिने मानले. कार्यक्रमाला इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाचे सदस्य विद्यार्थी तसेच प्रा. दत्तात्रय माळवदे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. गुरुप्रसाद लिंगायत, प्रा. अपर्णा तगारे, प्रा. राजेश कांबळे उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow