गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस हे जे पी नड्डांपेक्षा मोठे नेते, दोघांमुळे माझा प्रवेश जाहीर झाला नाही : एकनाथ खडसे

Sep 6, 2024 - 11:06
Sep 6, 2024 - 12:36
 0
गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस हे जे पी नड्डांपेक्षा मोठे नेते, दोघांमुळे माझा प्रवेश जाहीर झाला नाही : एकनाथ खडसे

जळगाव : "भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता,तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही.

याचा अर्थ जे पी नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस हे दोन्ही नेते मोठे आहेत", असं विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

मी संभ्रम अवस्थेत आहे, कन्फ्युज आहे हे मान्य

एकनाथ खडसे म्हणाले, मी संभ्रम अवस्थेत आहे, कन्फ्युज आहे हे मान्य आहे. गेली पाच ते सहा महिने भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. याचा अर्थ माझी त्यांना आवश्यकता नाही असेच दिसत आहे. काही अडचणी मुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी आजही कायम आहेत,भाजपाला गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे? मी या ठिकाणी आमदार आहे,चार वर्ष आमदार राहणार आहे.

अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते

पुढे बोलताना खडसे म्हणाले, अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभ राहणार अशी चर्चा आहे. आपल्या विरोधी लोकांना राजकीय हेतूने संपविण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. अनिल देशमुख दबावाने काम करत असतील तर ते राजकीय व्यक्ती आहेत,मात्र अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते. कोणीही दबाव आणला तरी नियमाने काम करणे हे अधिकाऱ्याचे काम होते. अनिल देशमुख यांच्या दबावाला बळी पडून काम करणारा अधिकारी दोषी आहे,राजकीय परिस्थीती बदलत आहे तशी परिस्थिती बदलत आहेत.

अनिल देशमुख यांनी मला सांगितल की, गिरीश महाजन मला छळत आहेत. नाथाभाऊ यांचे नाव घे,असं मी म्हटल तर योग्य होईल का? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर येऊन सांगावं की मी त्यांना सांगितल आहे. म्हणजे मला मान्य करता येईल,गिरीश महाजन यांचे आणि आपले मधुर संबंध असल्याने ते आपलं नाव नेहमी कुठे ना कुठे घेत असतात. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये समेट घडविण्याबाबत त्यांचं मत असलं तरी ते आपल्याला अवघड दिसत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow