राजापूरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात

Sep 6, 2024 - 13:43
Sep 6, 2024 - 13:47
 0
राजापूरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात

राजापूर : शहरातील जकातनाका- तालीमखाना ते जवाहरचौक मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करताना त्रासदायक ठरत होते. त्याची दखल घेऊन नगरपालिकेकडून हे खड्डे डांबर वापरून भरण्याला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शहरातील जकातनाका-तालीमखाना ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये कुशे मेडिकलसमोरील भागामध्ये तर खड्ड्यांमुळे रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. त्यामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळेनासे झाले आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे पडण्याच्या दरवर्षीच्या या समस्येने राजापूरवासीय यावर्षीही त्रस्त झाले होते. त्यातून, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी लोकांकडून केली जात होती. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसाचा अडथळा होता. पावसाचा जोर कमी झाल्यावर गेल्या दोन दिवसांपासून नगर पालिकेकडून मुख्य रस्त्यावरील खड्डे डांबराचा वापर करून बुजवण्याला सुरवात करण्यात आली आहे. आरडीसी बँकेच्या राजापूर शाखा कार्यालयाच्या परिसरातील खड्ड्यांसह अर्बन बँक कुशे मेडिकलच्या समोरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यातून, गणेशोत्सवापूर्वी शहरातील मुख्य रस्ता खड्डेमुक्त होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow