लांजा उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त..

Jul 1, 2024 - 14:57
Jul 1, 2024 - 14:59
 0
लांजा उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त..

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या लांजा शहरातील उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. वर्षभरात हा उड्डाणपूल पूर्ण होईल, अशी माहिती महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. कोर्ले तिठा जुने सार्दल दुकान ते साटवली तिठा असा एकूण ४७ पिलरचा ९०० मीटर उड्डाणपूल आहे. लांजा ग्रामीण रुग्णालय साटवली तिठा या ठिकाणी भुयारी मार्ग प्रस्तावित आहे.

लांजा शहरात उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य, खड्डे आणि उन्हाळ्यात प्रचंड धूळ याचा नागरिकांना त्रास होत होता. लांजा शहरातील गटारे, पाणी योजना पाईपलाईन यामुळे शरीरातील महामार्गाच्या कामाला विलंब झाला होता. ठेकेदाराने पुन्हा नव्याने उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे. उड्डाणपुलाच्या सद्यःस्थिती आणि एकूण स्ट्रक्चर याबाबत महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी उड्डाणपूल संभाव्य रेखाचित्र याबाबत माहिती दिली. शहरातील कोरले तिथे ते साटवली तिठा या मार्गात एकूण ४७ पिलर उभे राहणार आहेत. पुलाची उंची पाच मीटर आहे लांबी ९०० मीटर आहे. शिवा उकली गॅरेज या दरम्यान सुरुवात होऊन लांजा डेपो दरम्यान येथे झीरो होणार आहे.

साठवली तिठा आणि कोरले तिठा या ठिकाणी भुयारी मार्ग असेल. लांजा हायस्कूल, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी पादचारी सर्व्हिस रोड असेल. उड्डाणपुलाच्या खालील तळ भाग खुल्या स्वरूपाचा ठेवण्यात येणार आहे. बावनदी ते वाकेड हे आठशे कोटी रुपयाचे महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. लांजा गव्हाणे येथील उड्डाणपुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. देवधे येथे सर्विह्स रोड आहे. शहरातील गटाराचे काम आणि उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर घेण्याचे सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. लांजा एसटी बस स्थानक येथे सर्व्हिस रोड ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाहनतळाची मागणी
लांजा शहरातील नागरिकांनी उड्डाणपुलाच्या मार्गात ४ ठिकाणी सुलभ शौचालय होणे गरजेचे आहे. गणपती, शिमगोत्सव आणि इतर उत्सव काळात शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहनतळाची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow