खेड-साखरची एसटी बससेवा सुरू

Sep 6, 2024 - 14:52
Sep 6, 2024 - 15:04
 0
खेड-साखरची एसटी बससेवा सुरू

खेड : खेड आगारातून रोज सकाळी साडेनऊ वाजता पंधरागाव पट्टयातील साखर या ठिकाणी जाणारी एसटी बसफेरी अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पंधरागाव पट्ट्यातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. साखर गावाकडे जाणारी बस वेरळमार्गे तिसंगी, कुळवंडी, खोपी, कासई, कावळे, तळवटपाल, धामणंदमार्गे साखर या ठिकाणी जाते. या बसमुळे पंधरागाव पट्ट्यातील अनेक ग्रामस्थांचा खेडसह आजूबाजूच्या गावात जाण्याचा मार्ग सुकर होत होता. दवाखाना बाजारहाट या ठिकाणी जाण्यासाठीदेखील ही बसफेरी उपयुक्त ठरत होती. ती फेरी खेड आगारातून काही महिन्यांपासून बंद केली होती. ही फेरी पुन्हा सुरू करण्यासाठी पंधरागाव पट्टयातील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार विनय नातू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या संदर्भात माजी आमदार नातू यांनी रत्नागिरी येथील विभाग नियंत्रक बोरसे यांच्याशी संपर्क साधला आणि ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. 

त्यानंतर तातडीने त्यावर कार्यवाही झाली आहे. ही बससेवा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद चाळके व भाजपचे खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनीही खेड आगारप्रमुख राजेशिर्के यांच्याकडे निवेदन दिले होते. खेड-साखर बस सुरू झाल्यानंतर पंधरागाव पहुंचातील भाजप पदाधिकारी प्रमोद सकपाळ, अशोक पालांडे. पोलिस पाटील अनंत जानकर, मुकुंद पालांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow