जिल्हास्तरावर व्हावी शिक्षक भरती : आमदार राजन साळवी

Sep 6, 2024 - 14:28
 0
जिल्हास्तरावर व्हावी शिक्षक भरती : आमदार राजन साळवी

राजापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात शिक्षकपदे रिक्त आहेत. स्थानिक पातळीवर मोठ्यासंख्येने डीएड, बीएडधारक उमेदवार आहेत. मात्र, राज्यस्तरीय शिक्षकभरती प्रक्रियेचा त्याना मोठा फटका बसत आहे. या साऱ्यातून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुलांच्या शिक्षणाचा पुरता बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे शिक्षक प्रक्रियेतील त्रुटी दूर करून जिल्हास्तरावर शिक्षक भरती होण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी शिक्षण विभाग आयुक्तांकडे केली आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे आणि स्थानिक पातळीवर पात्र डीएड, बीएडधारक उमेदवार यांकडे लक्ष वेधले.

यासंबंधी काही सूचना आणि अडचणी असतील, तर डीएड व बीएडधारक उमेदवारांनी राजापूर आणि लांजा येथील शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

राज्यातील शिक्षकांची भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. या भरतीमध्ये राज्यातील सर्व विभागातील पात्र उमेदवार अर्ज करतात. त्याच्यातून अन्य जिल्ह्यातील शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरून त्यांची जिल्ह्यामध्ये नियुक्ती होते. कालांतराने आंतरजिल्हा बदलीची मागणी या शिक्षकांकडून हे शिक्षक स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow