चिपळुणात शांतता समितीची बैठक

Sep 9, 2024 - 10:43
Sep 9, 2024 - 11:48
 0
चिपळुणात  शांतता समितीची बैठक

चिपळूण : गणेशोत्सव व ईद सणांच्या पार्श्वभूमीवर चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या व भावना दुखावणाऱ्या  घटना घडू नयेत, त्याचप्रमाणे सण-उत्सव एकोप्याने साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात ईद-ए-मिलाद सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेरवाली बैठक झाली, या बैठकीत सर्वपक्षीय नेते व नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना अनेकांनी दोन्ही  सण शांततेत व सर्वधर्मसमभाव ठेवून साजरे करण्याबाबत आवाहन केले. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मार्गदर्शन करण्यात आले. सण, उत्सव काळात मोठी वाहतूक  कोंडी होण्याचे प्रकार पडतात. मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन केले. या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकत्व्सड, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, न.प मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांवकर, अधीक्षक अनंत मोरे यांच्यासह शांतता कमिटीगबील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी भोसले यांनी शहरातील व्यावसायिकांनी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow