रत्नागिरी : ५ हजार २७६ मुलींना मोफत एसटी पासचा लाभ

Jul 23, 2024 - 17:30
Jul 23, 2024 - 17:31
 0
रत्नागिरी :  ५ हजार २७६  मुलींना मोफत एसटी पासचा  लाभ

रत्नागिरी : तालुक्यातील विविध शाळेतील ५ हजार २७६ मुलींना मोफत पासचे वाटप करण्यात आले आहे. याचे वितरण सुरू राहणार असून, रत्नागिरी विभागातर्फे दहा हजार मुलींना मोफत पास वितरणाचे लक्षांक असणार आहे.

रत्नागिरी शहर तसेच ग्रामीण भागातील ३८ शाळांमध्ये हे मोफत पास वितरित करण्यात येत आहेत. यामध्ये शहर परिसरातील शाळांमध्ये ३७५०, पावसमध्ये ४८६. गणपतीपुळे ३३४, खंडाळा ३६६, जाकादेवी ३४० असे एकूण ५२७६ मुलींना पास वाटप करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे, ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्याकरिता, मुलींना शाळेत दाखल करण्याकरिता पालकांना प्रवृत्त करण्यासाठी तसेच शाळेत जाण्यासाठी प्रवासासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ५ वी ते १२ वी पर्यंतच्या ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास करण्याची सवलत अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येते. एकूण ५ हजार २७६ मुलींना पास वाटप करण्यात आले आहे.

महिनाभरात कार्यवाही होणार पूर्ण
ग्रामीण भागामध्ये पास वितरणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रत्येक शाळेतील पालक समिती मोफत पासच्या कार्यवाहीबाबत आढावादेखील घेत असते. त्यामुळे येत्या महिनाभरात बहुतांश शालेय मुलींना मोफत पास देण्याची कार्यवाही पूर्ण होणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:18 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow