अशैक्षणिक कामातून मुक्तता करण्याची गुहागर तालुका शिक्षक संघटनेची मागणी

Sep 9, 2024 - 11:44
Sep 9, 2024 - 13:49
 0
अशैक्षणिक कामातून  मुक्तता  करण्याची गुहागर तालुका शिक्षक संघटनेची  मागणी

गुहागर : गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे गुहागर तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तालुका शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये अग्रेसर राहावा म्हणून शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांना करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे व्हाईस चेअरमन अरविंद पालकर, कैलास शार्दुल, केंद्रप्रमुख संघटनेचे विश्वास खर्डे, शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र कुळे, कास्ट्राईब शिक्षक संघाचे अध्यक्ष सुहास गायकवाड, सरचिटणीस वैभवकुमार पवार, अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, शिक्षक समितीचे सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, अपंग शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम आदी मान्यवर व सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पं. स.द्वारे शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भडीमार होऊ नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, शिक्षकांना स्वयंप्रेरणेने काम करता यावे म्हणून गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली.

शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिले, पगार बिले आदी प्रश्न वेळीच मार्गी लावावेत असे ठरले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा व विविध स्पर्धा स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे अभिवचन देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:13 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow