रत्नागिरी : शिवसृष्टीतील पुतळा विटंबना प्रकरण - पर्यवेक्षक चौकशी अहवाल मुख्याधिकाऱ्यांना सादर

Sep 10, 2024 - 09:51
 0
रत्नागिरी : शिवसृष्टीतील पुतळा विटंबना प्रकरण - पर्यवेक्षक चौकशी अहवाल मुख्याधिकाऱ्यांना सादर

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्याच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याप्रकरणी रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलंबित झाले. या पर्यवेक्षकाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल न.प. च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केला आहे.

शिवसृष्टीतील मावळ्याच्या मूर्तीची तोडफोड झाल्या प्रकरणाची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक नितीन यादव यांच्यावर निश्चित करून त्यांना तात्पुरते निलंबितही करण्यात आले. इतर कर्तव्यात कोणती चूक झाली आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी एक चौकशी समिती नेमली होती. रत्नागिरी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीचे चौकशीचे काम पूर्ण झाले असून अहवाल मुख्याधिकाऱ्यांना सादर केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow