गुहागर : तळवली शेवरीफाटा रस्त्याची दैनावस्था

Aug 2, 2024 - 11:30
Aug 2, 2024 - 14:34
 0
गुहागर : तळवली शेवरीफाटा रस्त्याची दैनावस्था

गुहागर : तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉपपर्यंतच्या मार्गावर खड्डे पडल्याने हा मार्ग चिखलमय झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांत खड्डे न भरल्यास या खड्यांमध्ये वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. रस्त्याचे दुखणे गेले कित्येक वर्षे संपल्या संपत नसल्याने प्रवासी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. चिखलमय 
रस्त्यातून मार्ग काढताना पूर्णपणे दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खड्डेमय बनणाऱ्या या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि प्रशासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने गुहागर मनसे आक्रमक झाली आहे. आगामी दोन दिवसात खड्डे न भरल्यास खड्डामध्ये वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

तत्काळ या रस्त्याची डागडुजी केली नाही तर मनसेच्यावतीने खड्यात वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow