रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरचे खड्डे गणेश विसर्जनापूर्वी भरण्याचे नियोजन

Sep 10, 2024 - 10:40
Sep 10, 2024 - 11:02
 0
रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरचे खड्डे गणेश विसर्जनापूर्वी भरण्याचे नियोजन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील सर्वच ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम गणेश आगमनापर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. आता हे खड्डे गौरी-गणपती विसर्जनापूर्वी पूर्ण भरण्याचे नियोजन रत्नागिरी नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वी मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी भरण्याचे नियोजन पूर्ण झाले होते; परंतु मुसळधार पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडले गेले.

दरम्यान, भरलेले खड्डे पुन्हा उखडल्यानंतर ते भरण्याचे काम करावे लागले. त्यामुळे काही दिवस वाया गेले. याचा परिणाम म्हणून अंतर्गत रस्त्यांवरील अनेक ठिकाणचे खड्डे तसेच राहिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow