खेडमध्ये २९ वर्षे लोककलेतून जनजागृती कार्यक्रम

Sep 10, 2024 - 13:26
Sep 10, 2024 - 14:02
 0
खेडमध्ये २९ वर्षे लोककलेतून जनजागृती कार्यक्रम

खेड : तालुक्यात जामगे येथे दरवर्षीप्रमाणे गौरी- गणपती सणानिमित्त शिवतेज संस्थेतर्फे व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जाखडी लोककला सादर करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देणे तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे म्हणून सलग २९ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

शनिवारी (ता. ७) गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर जाखडी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गणराय ही कलेची देवता सकल देवतांचा आराध्य गणराय कोकणात भक्तांच्या मनात व घरात विराजमान झाला आहे. या उत्सवात अस्सल कोकणी जाखडी व भजनकलेला हक्काचे स्थान असते. या कलेतून भक्तीभाव जागृत करण्यासोबत कलाकार समाजप्रबोधनही केले जाते. या कलेला जामगे या मूळ गावी शिवसेना नेते रामदास कदम यांनी गेल्या २९ वर्षांपासून राजाश्रय मिळवून दिला आहे. यंदाही कदम यांच्या प्रेरणेने आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेज आरोग्यसेवा संस्थेतर्फे व्यसनमुक्ती प्रसार व प्रचार कार्यक्रम राबवण्यात येत आहे. १९९५ मध्ये राज्यमंत्री झाल्यानंतर रामदास कदम यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. येथे येणाऱ्या शेकडो जाखडी व भजन मंडळांना कला जोपासण्यासाठी मानधन, ढोलकी, टाळ, पेटी देऊन सन्मानित केले जाते.

जाखडी ही लोककला लोप पावत आहे. त्यामुळे ही कला जिवंत ठेवण्यासाठी आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रामदास कदम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम अविरत सुरूच राहील. - योगेश कदम, आमदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:55 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow