रत्नागिरी औद्योगिक वसाहतीमधील माचकर पिता-पुत्रांनी साकारले संत नामदेवाचे चलचित्र

Sep 10, 2024 - 13:30
Sep 10, 2024 - 14:04
 0
रत्नागिरी औद्योगिक वसाहतीमधील माचकर पिता-पुत्रांनी साकारले संत नामदेवाचे चलचित्र

रत्नागिरी : रत्नागिरी औद्योगिक वसाहतीमधील संतोष माचकर आणि त्यांचा मुलगा रोहित यांनी बनविलेले 'संत नामदेवां'च्या कथेवरील चलचित्र जिल्ह्यासह परजिल्ह्यातील गणेशभक्तांना भुरळ घालत आहे. गेली ३७ वर्षे माचकर कुटुंबीय चलचित्रातून आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आले आहेत.

माचकर यांचा औद्योगिक वसाहतीत फर्निचर व्यवसाय आहे. त्यांनी बनवलेल्या चलचित्रात नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयीची कथा दाखवण्यात आली आहे. एकदा ज्ञानेश्वर, विसोबा खेचर आणि आणखी काही वारकरी भजन म्हणत असतात. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्यांनी प्रार्थनेत व्यत्यय येत असल्यामुळे संत मंडळींना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर नामदेव मंदिराच्या मागील बाजूला जातात आणि तिथे भजन म्हणू लागतात. तेव्हा उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजन ऐकण्यासाठी देव मंदिर फिरवितो आणि मंदिराचा दर्शनी नामदेवापुढे येतो. अशी कथा चलचित्राचून माचकर पिता-पुत्रांनी बांधणी अगदी कौशल्याने केली आहे. त्यांच्या या चलचित्राची वारकयासह भक्तांनाही भुरळ पडली आहे

गेल्या वर्षी कृष्णजन्माचा देखावा करण्यात आला होता. मागील ३७ वर्षात त्यांनी अनेक चिलचित्रे तयार केली. आठ आकड्यात कोकणरेल्वे फिरवण्याचे अवघड दृश्य त्यांनी साकारले होते. त्याची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली. रामायण, महाभारत, कृष्णजन्म, संत नामदेव, यसोबा खेचर या सारखी अनेक चलचित्रे परटवणे येथे राहात असताना गणेशभक्तांना पाहायला मिळाली.
 
त्यासाठी ज्येष्ठ मूर्तिकार-रंगभुषाकार नरेश पांचाळ व चिन्मय पांचाळ यांनी साजेसे मुखवटे तयार केले. मागील वर्षातील सर्व चलचित्रांचे देखाव्यांची पुनरावृत्ती करणार असल्याचे संतोष माचकर यांनी सांगितले.

गणेशभक्तांची वर्दळ
यंदा संत नामदेव कथेवर चलचित्र साकारले आहे. संत नामदेवांची ही जुनी कथा नव्या पिढीला माहित व्हावी, जनजागृती व्हावी ही संकल्पना लक्षात घेऊन हे चलचित्र साकारण्यात आले आहे. चलचित्र तयार करण्यासाठी आठ दिवस लागले. ही चित्रे पाहण्यासाठी गणेशभक्तांची वर्दळ वाढली आहे. असे माचकर यांनी सांगितले. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:58 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow