चिपळूण : कोळकेवाडीतील पुनर्वसितांसाठी साडेतीन कोटी; आ. शेखर निकम यांचा पाठपुरावा

Sep 11, 2024 - 10:30
 0
चिपळूण : कोळकेवाडीतील पुनर्वसितांसाठी साडेतीन कोटी; आ.  शेखर निकम यांचा पाठपुरावा

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील कोयना प्रकल्पांतर्गत पुनर्वसित वाड्या सुमारे १५ वर्षांपासून विकासकामांपासून दुर्लक्षित राहिल्या होत्या, सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष झाले; मात्र आमदार शेखर निकम यांनी कोळकेवाडीतील पुनर्वसित वाड्यांसाठी पाठपुरावा केला.

 त्यामुळे कोळकेवाडीतील बौद्धवाडी, बोलाडवाडी हासरेवाडी पूर्व, हसरेवाडी पश्चिम, तांबडवाडीसाठी ३ कोटी ६० लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली, त्यामुळे या वाड्यांमधील रखडलेली विकासकामे मार्गी लागतील. तालुक्यातील कोळकेवाडी येथील बौद्धवाडी, बोलाडवाडी हासरेवाडी पूर्व, हसरेवाडी पश्चिम, तांबडवाडीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून विकासकामे
झालेली नव्हती, त्यासाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलने केली. शासनाला पत्रव्यवहार केला तरीही त्याची फारशी दखल घेण्यात आलेली नव्हती. येथील पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत पुनर्वसित वाक्यांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आमदार निकम यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठपुरावा केला. गेल्या वर्षभरात मंत्रालयीन स्तरावर ५ ते ६ बैठका झाल्या; मात्र येथील कामांना प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने पदाधिकारी निराश झाले होते. सोमवारी (ता. ९) कोळकेवाडीतील पुनर्वसित वाड्याना ३ कोटी ६० लाखांच्या कामांना मंत्रालयातून प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रस्तावित काने यापूर्वी अन्य योजनेतून झालेली नाहीत, याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी खातरजमा करून निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना केल्या आहेत.

या निधीतून उभारणार काय ?
स्मशानभूमी निवारा शेड ,गुरांच्या पाण्याचा हौद ,बोलाडवाडी येथे समाजमंदिर ,पाण्याचे जंगली गटर ,शेतात जाण्यासाठी पाखाडी

कोळकेवाडी येथील पुनर्वसित वाड्यांना भौतिक सुविधा मिळाव्यात, तेथील ग्रामस्थांसाठी आवश्यक विकासकामे मार्गी लागावीत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मंत्रालयात बैठकाही झाल्या. त्यामुळे निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शेखर निकम, आमदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow