विषारी औषध प्राशन केलेल्या पाली वळके येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Sep 11, 2024 - 10:54
 0
विषारी औषध प्राशन केलेल्या पाली वळके येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील पाली वळके धनगरवाडी येथे अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या युवकाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात बुधवार ४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. संकेत दत्ताराम कोकरे (१९, रा. वळके धनगरवाडी पाली) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. 

त्याने २७ ऑगस्ट रोजी शेतात विषारी औषध प्राशन केल्यामुळे तो बेशुद्ध स्थितीत मिळून आला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाण उपचारांदरम्यान ४ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वा. संकेतचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow