फूलविक्रीतून लाखोंची उलाढाल!

Sep 11, 2024 - 11:10
Sep 11, 2024 - 12:13
 0
फूलविक्रीतून लाखोंची उलाढाल!

चिपळूण : लाडक्या बाप्पाच्या रंगीबेरंगी फुलपानांची आपल्या आगमनाला आरास करण्यासाठी भाविकांनी चिपळूण खेर्डीच्या बाजारात फूल खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे फूल विक्रीची दुकाने गर्दीने फुलून गेली आहेत. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून फूल खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

खेर्डी येथे महबूब शेख आणि इमरान मकानदार फूल विक्रीचा व्यवसाय करतात. चिपळूण शहरात किरण जागुष्टे फूल विक्रीचा व्यवसाय करतात. खेर्डी उपनगर आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थ चिपळूण आणि खेडींमधून फुले विकत घेऊन जातात. गावोगावी फूल विक्रीचा व्यवसाय करतात. झेंडूच्या आणि गुलाबाच्या फुलांच्या हाराला त्यांच्याकडे जास्त मागणी असते. गणेशोत्सव काळात त्यांच्याकडे सध्या फुलांना मागणी वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातून फुलांची आवक होते शिवाय मुंबईच्या वाशी मार्केट, सातारा, सांगली या जिल्ह्यांतूनही फुले येतात. सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यातून फुले येतात. तासगाववरून गुलाब येतात. मावळ तालुक्यातून कट फ्लॉवर येतात. नाशिकवरूनही फुले येतात. ग्रामीण भागातील महिला आंब्याची डहाळी, बेल, दुर्वा हे साहित्य घेऊन चिपळूण शहरात विक्रीसाठी येतात. गणपतीच्या पूजेसाठी लागणारी फळे आणि पानांची विक्री करतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow