संगमेश्वरात भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Sep 11, 2024 - 12:17
 0
संगमेश्वरात भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

संगमेश्वर : तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला असला तरीही भातशेतीवर अनेक गावांमध्ये करपा रोग पडला आहे. गोळवली गावातील भातशेतीवर मोठ्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. याबाबत कृषी सहाय्यकांना सांगूनही ते गावाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच नॅनो युरिया फवारणीची संधी मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

संगमेश्वर तालुक्यात अनेक गावांत करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहाय्यक सहकार्य करत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भातशेतीवर करपा रोग पडू नये म्हणून तालुका कृषी विभागाकडून मिळणारे नॅनो युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे परिस्थिती बिकट आहे. शेतामध्ये पाणीच नसल्यामुळे जमीन सुकलेली आहे. परिणामी, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती आहे. गावातील भातशेतीवर करपा रोग पडला असल्याचे सांगूनही कृषी सहाय्यक गावात येत नाहीत, असे प्रगतशील शेतकरी पुरूषोत्तम पाध्ये यांनी सांगितले तसेच नॅनो युरिया फवारणी औषध नक्की जाते कुठे, असा प्रश्न पाध्ये यांनी उपस्थित केला असून याबाबत कृषी विभागाची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow