गणपतीपुळेत आज गौराईचे विसर्जन

Sep 12, 2024 - 11:00
 0
गणपतीपुळेत आज गौराईचे विसर्जन

गणपतीपुळे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे एक गाव एक गणपतीची प्रथा सुमारे पाचशे वर्षांपासून मोठ्या भक्ती भावाने जपली जात आहे. गुरुवारी गौराईंचे विसर्जन करण्यात येणार आहे.

या ठिकाणी घरोघरी गणपती मूर्ती न आणता गणपती मंदिरातील मूर्तीलाच आपले आराध्य दैवत मानून गणपती मंदिरातील भाद्रपदी उत्सवात सहभाग घेतला जातो. या उत्सवात सर्व ग्रामस्थ एकोप्याने सहभागी होतात. या ठिकाणी केवळ गौराईचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा होतो.

मंगळवार दि. १० सप्टेंबर रोजी गौराईचे गणपतीपुळे परिसरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. त्यानंतर गौराई उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने दीड दिवस साजरा करण्यात आला. या गौराईचे विसर्जन गुरुवारी गणपतीपुळे खाडीकिनारी मोठ्या धुमधडाक्यात आणि जल्लोषात करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow