शुभेच्छा फलकाशी छेडछाड केल्याच्या निषेधार्थ दापोलीत रास्ता रोको आंदोलन

Sep 12, 2024 - 11:42
 0
शुभेच्छा फलकाशी छेडछाड केल्याच्या निषेधार्थ दापोलीत  रास्ता रोको आंदोलन

दापोली : गणेशोत्सवानिमित्त आमदार योगेश कदम यांच्या कार्यकत्यांनी उभा केलेल्या शुभेच्छा फलकाशी अनोळखीने छेडछाड केल्याच्या निषेधार्थ दापोली-खेड रस्त्यावर अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शिदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्या संशयित आरोपीला लवकरात लवकर शोधून काढून त्याच्यावर काएक कारवाई करू, असे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

दापोली-खेड-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांचे गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देणारे फलक दापोलीत सावलेले आहेत. त्यातील एका फलकावरील छायाचित्राशी छेडछाड करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवसैनिक संतापले होते. या प्रकाराच्या निषेधार्थ दापोली-खेड रस्त्यावर टाळसुरे वाकण येथे शिवसेना नेते नीतेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली
रास्ता रोको करण्यात आला.

हा प्रकार मंगळवारी रात्री अज्ञाताने केला आहे. त्या विकृताला तत्काळ अटक करा, अशी मागणी करत टाळसुरे येथे रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांशी संवाद साधत  आरोपीला लवकरात लवकर शोधून अटक करण्यात येईल, असे आशवासन दिले. त्यात काही काळ चाललेले आंदोलन मागे घेणतात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, या प्रकरणी नीलेश शेठ यांनी कार्यकार्यासह दापोली पोलिस ठाण्यात निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

गणेशोत्सवात झालेल्या या कृत्याच्या निषेधार्थ गौरी विसर्जनानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. करणाऱ्याचा आम्ही निषेध केला आहे. - नीलेश शेठ, शिवसेना नेते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow