चिपळूण : 'चुकलेली वाट' देखाव्यातून नव्या पिढीला संदेश

Sep 13, 2024 - 11:20
 0
चिपळूण :  'चुकलेली वाट' देखाव्यातून नव्या पिढीला संदेश

चिपळूण : चिपळूण शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे गणेशोत्सव मित्र मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात चुकलेली वाट हा जिवंत देखावा सादर केला आहे. नव्या पिढीला योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. नव्या पिढीतील मुला-मुलीना मोलाचा संदेश देणारा हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

गणेशोत्सवात गणेश मंडळांनी आरास, देखावे भाविकांना पाहण्यासाठी खुले केले आहेत. यावर्षी मोजक्या गणेश मंडळांनी देखावे सादर करून भाविकांना तललीन करण्याचा प्रयत्न केला आहे. चिपळूण श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अयोध्येतील मंदिराचा देखावा तयार केला आहे. खेडों येथील पवार पेंटर यांच्या गणेशोत्सव मंडळाने माखन चोर या विषयावर देखावा तयार केला आहे. चिपळूण मधील महर्षी अण्णासाहेव कवें भाजी मंडई गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी पौराणिक धार्मिक ऐतिहासिक सामाजिक अशा विविध विषयांवर संदेश देणारे देखावे तयार केले जातात. गणेश उत्सवाच्या निमित्ताने भाविकांना वेगळा संदेश देण्याची परंपरा गेली ४४ वर्ष सुरू आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेकांना आपल्याला मुलगाच हवा अशी अपेक्षा असते त्यासाठी देवधर्म, नवस किंवा प्रसंगी अघोरी कृत्यही केली जातात.

स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार पुढे येत आहेत. या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणारा जिवंत देखावा या मंडळाने यापूर्वी सादर केला होता. त्यानंतर आता चूकलेली वाट हा जिवंत देखावा तयार करण्यात आला आहे. वयात येणाऱ्या मुला-मुलींनी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध वागू नये. वाट चुकल्यानंतर त्याचे समाजावर आणि कुटुंबावर काय परिणाम होतात, याचे प्रबोधन करण्यात आले आहे.

दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा आई-वडिलांना त्यांच्या वागण्याचा त्रास होईल असे कृत्य करू नये असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. अजय यादव या देखाव्याचे लेखक दिग्दर्शक आहेत. अनमोल यादव यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. भरत गांगण, मारुती करंजकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करण्यात आला आहे. साक्षी कोलगे, केतकी कारेकर, उदय करंजकर, अनंत शिगवण आणि अजय यादव हे या देखाव्यामध्ये कलाकार आहेत.

चुकलेली वाट हा देखावा सर्वांसाठी खुला आहे. तो पाहून नव्या पिढीने आपल्या वागण्यामध्ये बदल करावा. चांगले राहावे, चांगले वागावे, गणेश उत्सवानिमित्त सामाजिक एकोपा कायम राहावा, यासाठी हा देखावा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. रघुनाथ भालेकर, सदस्य, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow