खेडमध्ये १० हजार ६०२ घरगुती, ३ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन

Sep 13, 2024 - 10:05
Sep 13, 2024 - 13:59
 0
खेडमध्ये १० हजार ६०२ घरगुती, ३ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन

खेड : तालुक्यासह शहरात घरांमध्ये विराजमान झालेल्या १० हजार ६०२ तसेच ३ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे व गौरींचे पाच दिवसांनी गुरुवार, दि.१२ रोजी भक्तिमय वातावरणात नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.

खेड तालुक्यात गणेश चतुर्थीला घरोघरी भक्तांनी गणेशाची स्थापना केली. त्यासोबतच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील गणेशमूर्तीची मनोभावे पूजाअर्चा करून उत्सवाला सुरुवात केली. मंगळवार दि. १० रोजी अनेक घरांमध्ये गौरीचे आगमन झाले. दि. ११ रोजी गौरी व गणरायाचे मनोभावे पूजन करून नैवद्य दाखवण्यात आला. मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशाची पाच दिवस सेवा केल्यावर गुरुवार, दि. १२ रोजी तालुक्यातील १० हजार ६०२ घरगुती व तीन सार्वजनिक गणरायांचे नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.

खेडच्या जगबुडी नदीच्या गणेश घाटावर मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. विसर्जन कट्टा अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष निखिल चौधरी, सचिव साहिल बुटाला, खजिनदार साईराज खेडेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी जगबुडी व नारिंगी नदीपात्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी भाविकांना सहकार्य केले. गर्दी टाळण्यासठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ढोल-ताशांच्या आतषबाजी करत गणरायाला निरोप दिला. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:22 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow