देवरुखात वटपौर्णिमेलाच जुना वटवृक्ष कोसळला

Jun 26, 2024 - 13:43
 0
देवरुखात वटपौर्णिमेलाच जुना वटवृक्ष कोसळला

देवरुख : ग्रामदेवता सोळजाई मातेच्या मंदिर परिसरामध्ये असलेला वटवृक्ष वटपौर्णिमेच्याच दिवशी कोसळला. हा वृक्ष पडल्याने महावितरणच्या तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला होता. वृक्ष दूर करून चार तासाने विद्युत प्रवाह सुरुवात करण्यात आला. वटपौर्णिमेच्याच दिवशी वटवृक्ष उन्मळून पडल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

हा वटवृक्ष फार जुना होता. त्याच्या संवर्धनासाठी सोळजाई देवस्थानने बाजूने पार बांधला होता. तरीही जुना असल्याने वृक्ष कोसळला. वृक्ष पडल्याने विद्युत तारा तुटल्या पोलही वाकले. ही घटना दुपारी घडली. महावितरण कर्मचारी व नागरिकांनी वटवृक्ष बाजूला केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow